मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
जाहिरात
 
 
स्वागत

ज्ञातिबांधवांनो

सप्रेम नमस्कार !

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजोन्नती मंडळ,मुलुंड,मुंबई यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या या वेब साईटवर आपणा सर्व ज्ञातीबांधवांचे आम्ही अतिशय मन:पूर्वक स्वागत करीत आहोत.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे ब्रीदवाक्य ज्या दोन सूत्रमय शब्दांनी व्यक्त केले जाते ते शब्द म्हणजे असि व मसि. असि म्हणजे तलवार व मसि म्हणजे शाई वा लेखणी. गेल्या 2000 वर्षांत विक्रम संवताच्या स्थापनेपासुन असिजीवी – मसिजीवी जीवन जगणारे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु तलवार व लेखणी हेच आपले प्रतिक मानतात. गेल्या अनेक वर्षांत या देशांत अनेक सामाजिक स्थित्यंतरे झाली पण तरीही आपल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाने आपली क्षात्रवृत्ती व लेखनवृत्ती आजमितिपर्यंत कायम ठेवलेली आहे हे विशेष. व हेच आपल्या समाजाचे सर्वांत मोठे यश आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वोतपरी मदत करणाऱया व प्रसंगी बलिदान करणाऱया ज्या ज्ञाती होत्या त्यामध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ही आपली ज्ञाती अग्रस्थानी होती.व हे आपण एक कायस्थ प्रभु म्हणुन अतिशय अभिमानाने सांगु शकतो. शिवशाहीसाठी आपल्या कायस्थ वीरांनी फार मोठे आत्मसमर्पण केले.

अधिक वाचा
आमचे आवाहन

प्रिय सभासद बंधू/भगिनी, सप्रेम नमस्कार. 

अलीकडे वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातमीनुसार आपल्या मंडळाची "दत्ताजी ताम्हणे सभाग्रुह" ही वास्तू कदाचित कायद्याच्या कचाट्यात सापडून आपणास सोडावी लागेल, किंवा ती पाडली जाईल. अश्या परिस्थितीत आपणास तातडीने दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. सद्य परिस्थितीत आम्ही आपणास असे आवाहन करीत आहोत की, या नव्या वास्तूसाठी आपण सर्वांनी आम्हाला आर्थिक, किंवा नवीन जागा भाड्याने उपलब्ध करुन देण्यास मदत करावी. ज्याला जशी मदत करणे शक्य असेल त्याने आपापल्या परीने आम्हाला मदत करुन आमचे हात बळकट करावे ही नम्र विनंती! सोबत आपल्या पाच कार्यकारीणी सभासदांची नावे आणि फोन नं दिले आहेत. आपण लवकरात लवकर यापैकी कोणत्याही सभासदाशी संपर्क साधून आपली मदत करण्याची पध्दत आम्हास कळवावी. आपल्या सूचनांची आम्ही वाट पहात आहोत हे लक्षात ठेवा. धन्यवाद!!

सहाय्य करण्यासाठी संपर्क:

समीर नरेंद्र दळवी 
9920026074

निलेश कारखानीस 
9020146662

सुलेश कर्णिक
9004093490

बिपिन कुळकर्णी 
9820074205

पंकज गडकरी
9867399262

घडलेल्या प्रमुख घटना
कै.दत्ताजी ताम्हणे यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्ताने एक मेडिकल क्यांप घेण्याचा आमचा मानस होता पण काही कारणास्तव तो उपक्रम आम्हाला राबविता आला नाही.म्हणून त्या निमित्ताने १९ जुलै २०१५ रोजीकालिदास क्याफे मुलुंड (प) येथे सकाळी ९.३० वाजता “ पावसाळी रोगांवर उपचार व मार्गदर्शन आणि स्त्री समस्या  “ ह्या विषयी एक कार्यक्रम आयोजित केला.
अधिक वाचा
 
आगामी कार्यक्रम
 

Naturopathy Lecture

Topic-Naturopathy Speaker- Mr Atul Gadkari, Venue- Kalidas Cafe
Time-6pm onwards
Registration required Per person. Rs.200/-
Can be paid at registration counter on the event day

View Details

 
नोटिस बोर्ड

Naturopathy Lecture

Topic-Naturopathy Speaker- Mr Atul Gadkari, Venue- Kalidas Cafe
Time-6pm onwards
Registration required Per person. Rs.200/-
Can be paid at registration counter on the event day