मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
आमच्याविषयी
इतिहास
घटना व नियम
विश्वस्त मंडळ
कार्यकारीणी
द.ताम्हणे सभागृह
कशी द्याल जाहिरात
वार्षिक अहवाल
 
 
 
 
 
इतिहास
मुलुंडमध्ये भाऊसाहेब प्रधान बाप्पासाहेब दळवी, वसंतराव चित्रे अशा काही ज्ञातबांधवांनी चालविलेले कायस्थ प्रभु समाज हे मंडळ काही कारणाने बरखास्त झाले होते. 1971 साली ठाणे येथील काही कार्यकर्ते ऍड. नाथ ताम्हणे यांचेकडे भेटून गेले. त्यानंतर मुलुंडमधील तरुण कार्यकर्ते जगदीश नीतीन, अरुण व चिंतामणी या कार्यकर्त्यांशीही काही लोकांनी संपर्क साधला. नव्या उत्साहाने व नव्या जोमाने मंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही तरुण मंडळी ऍड नाथ ताम्हणे व वसंतराव चित्रे यांना भेटली. मंडळ स्थापन केले तरच आपल्याला ठाणे येथील परिषदेत मुलुंडकरांचे सांस्कृतिक व बौध्दिक सामर्थ्य दाखविता येईल हा विचार निश्चित होऊन मुलुंडमध्ये पुन्हा ज्ञातीसंघटनेचे वारे वाहू लागले. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धेला उधाण आले व प्रथमच छापील मतपत्रिकेद्वारा नवीन मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले. हा अभूतपूर्व कार्यक्रम ऍड. नाथ ताम्हणे यांच्या एकमजली गच्चीवरच झाला. अत्यंत उत्साही व अगत्यशील असलेल्या सौ. विमलमामी ताम्हणे यांनी सुमारे 200 ज्ञातीबांधवांना स्वखर्चाने कॉफीपान दिले. अशा उत्साहात नव्या संस्थेची स्थापना झाली व लहानमोठे हा भेदाभेद न करता सर्व ज्ञातीबांधवांशी एकरुप होण्याचा तरुण कार्यकर्त्यांनी संकल्प सोडला व चां.का.प्रभु समाजोन्नती मंडळ असे नाव धारण करण्याचा आग्रह धरला व सर्वच मंडळींनी या समयोचित नावावर शिक्कामोर्तब केले. (अखिल भारतीय परिषदेचे नावसुध्दा समाजोन्नती परिषद असेच होते) चां. का. प्रभु समाजाने 26 जाने. 1969 रोजी कै. राम गणेश गडकरी यांचा 50 वा स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळचे समाजाचे अध्यक्ष श्री. बाप्पा दळवी व उपाध्यक्ष श्री. अण्णा ताम्हणे यांनी आयोजित केलेल्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक हे होते. त्याच समारंभात कै. राम गणेश गडकरी यांच्या पत्नी रमाबाई गडकरी यांचा सत्कार केला. महाराष्ट्र शासनाने 26 मे 1984 ते 25 मे 1985 या काळात कै. राम गणेश गडकरी यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्यपातळीवर साजरे करण्याचे ठरविले. याचाच आधार घेउढन आपल्या संस्थेने पुढाकार घेऊन मुलुंडमधील सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक अशा 23 संस्थांना एकत्र आणून एक भव्य दिव्य कार्यक्रम साजरा केला. कै. राम गणेश गडकरी जन्मशताब्दी समारोह संयुक्त महासमितीची स्थापना करुन या समितीतर्फे निरनिराळे सांस्कृतिक, शैक्षणिक व स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले गेले. या कार्यक्रमाचा शुभारंभ पंडीत हॉल, मुलुंड (पूर्व) येथे झाला ज्यात थोर समाजसेवक व लेखक श्री. अण्णा ताम्हणे व जुन्या पिढीतील ख्यातनाम नट श्री. भोलाराम आठवले यांनी प्रमुख भाग घेतला. शताबदी वषात कै. राम गणेश गडकरी यांच्या विषयीच्या निबंध स्पर्धा, वर्क्तृत्व स्पर्धा, नाट्यगीत व कविता, गायन स्पर्धा आदी निरनिराळ्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करुन सर्व विजेत्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मुलुंडमधील शाळांतून श्री. अण्णा ताम्हणे व श्री. सुधाकर काळसेकर यांनी गडकरी नाटककार, कवी, विनोदी लेखक या विषयांवर व्याख्याने आयोजित केली. सदर शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन दि. 19 मे 1985 रोजी महाराष्ट्र सेवा संघ हॉल, मुलुंड (पूर्व) येथे करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणारी शताब्दी महासमिती पुढीलप्रमाणे होती – अध्यक्ष - श्री. भा. ग. उर्फ भाईसाहेब प्रधान उपाध्यक्ष - श्री.दत्ता फडणीस, श्री. गोपाळराव भोसले, सौ. ज्योत्स्ना पारधी कार्याध्यक्ष - श्री.ग. बा. उर्फ अण्णा ताम्हणे उपकार्याध्यक्ष - श्री. वसंत केतकर प्रमुख कार्यवाह - श्री. सुधाकर उर्फ भाई काळसेकर सह कार्यवाह - श्री. श्रीकांत देशमुख, श्री. सुरेश प्रधान कोषाध्यक्ष - श्री. विश्वास ना. चढावकर सहकोषाध्यक्ष - श्री. जयंत कुळकर्णी मुलुंड मधील हौशी कलाकार ज्ञाती बंधु भगिनींनी परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन चषक व पदके मिळविली व मुलुंडचे नाव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उज्वल केले. यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो श्री. नितीन बगवाडकर, श्री. चिंता गडकरी व श्री. व सौ. प्रसन्नकुमार कर्णिक, ऍड. शरद लक्ष्मण दिघे (हे मंडळाचे बऱयाच काळ अध्यक्ष होते) त्याच सुमारास संस्थेचे एका घरात होती हे हौशी कलावंतांचे नाटक व्यावसायिक दर्जाप्रमाणे उत्कृष्टपणे सादर केले यात सौ. (श्रीमती) शैलजा दिघे व श्री. चिंतामणी गडकरी यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. डोंबिवली येथे सध्या वास्तव्य करीत असलेले मंडळाचे त्याकळचे अत्यंत कष्टाळू, जिद्दी, तरुण कार्यकर्ते श्री. सुरेश द. प्रधान यांचा नामोल्लेख आवर्जून करणे भाग आहे. त्यांनी मुलुंडमधील आठही दिशा सोडल्या नाहीत की जे ज्ञातीबांधवांना अपरिचित आहेत. बरेचसे ज्ञातीबांधव त्यांना सोडेवाले प्रधान म्हणूनही ओळखतात. त्यावेळचे मंडळाचेआणखी एक वैशिष्ट्य म्हणजे (वस्ती अत्यल्प असल्यामुळे) मुलुंडमधील कोणत्याही ज्ञातीबांधवाकडे दुःखद घटना घडली हे कळल्यावर मंडळाचे संपूर्ण कार्यकारी मंडळ तेथे उपस्थित राही. या कामी प्रत्येकास निरोप देणे हे जिकीरीचे वाटणारे काम राजीखुशीने मंडळाचे जुने कार्यकर्ते र. द. उर्फ बाळ रणदिवे हे करीत असत. मंडळाने नागपूर येथील संमेलनातही आपली झलक दाखविली व आपला ठसा उमटविला. कोजागिरी इ. नैमित्तिक कार्यक्रमाबरोबरच निसर्गरम्य ठिकाणी झलक जाण्याचा उपक्रमही चालू होता. आमचे ज्येष्ठ ज्ञातीबंधू कै. परशराम उर्फ भाऊ आबाजी नाचणे हे वृध्दापकाळामुळे मंडळाच्या कोणत्याही पदावर वा कार्यकारी मंडळात नसूनही आपल्या आगळ्यावेगळ्या निरलस सेवेमुळे सर्वांच्या स्मरणात राहतील. (वयोवृध्द भाऊ नाचणे दरमहा दर ज्ञाातीचे घरटी फक्त एक रुपया वसूल करीत असत. त्यांना अनेकांनी वर्षाचे रुपये 12 एकदम घेऊन जा अशी त्यांच्या वयाकडे पाहून विनंती केली असता देखील मला ही ज्ञातीतील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी अशी सेवा करण्याचा आनंद मिळू द्या. असे ते सांगत) असा ह्या भाऊंनी जमविलेला फंड कै. वसंतराव चित्रे व श्री.ग. बा. ताम्हणे यांचे स्वाक्षरीने मुलुंड (पू.) येथील बँक ऑफ इंडिया येथे जमा केला व त्याचा विनियोग करण्याचा अधिकार वरील दोघांकडे दिला. यातील शिल्लक राहिलेली रक्कम सध्याच्या शिक्षण फंडात जमा केलेली आहे. ऍड. शरद दिघे यांनी वारंवार सर्वसाधारण सभेत सूचना केल्यामुळे सौ. वृंदा बक्षी व सौ. वैशाली कुळकर्णी यांनी प्रथम ज्ञातीचा महिला विभाग सुरु केला. त्यामर्फत चैत्रगौरीचे संक्रांतीचे हळदीकुंकू व सौ. उर्मिला कर्णिक (डोंबिवली) यांच्या केक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. सध्याची सरकारी नोंदणीकृत संस्था कशी झाली व कोणाच्या विशेष उल्लेखनीय कार्यामुळे झाली हे सांगणे अगत्याचे आहे. कार्याध्यक्ष आ. गो. उर्फ अप्पा देशमुख व त्यावेळचे धडाडीचे व अत्यंत परिश्रम घेणारे श्री. श्रीकांत पु. राजे तसेच जयंत पु. कुळकर्णी यांच्या अथक परिश्रमामुळे संस्थेचे बऱयाच काळ रेंगाळत पडलेले सरकारी नोंदणीचे काम सन 1988 साली पूर्ण झाले व संस्था धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात नोंदली गेली. या कामी सुवाच्च अक्षर असलेले श्री. विक्रांत बक्षी यांनी लेखनिक म्हणून काम केले. मंडळाचे वयोवृध्द कार्यकर्ते (तांबे नगर, मुलुंड पश्चिम) व माजी कोषाध्यक्ष कै. श्री. यशवंत वामन गडकरी यांचाही उल्लेख येथे आवर्जून करण्याचे कारण बऱयाच काळ त्यांनी तांबेनगर येथील परिसरातील 100 टक्के वर्गणी वसूल करुन व वेळोवेळी तेथील ज्ञातीबांधवांना न चुकता पत्रके घरोघरी जाऊन दिली. वय व प्रकृती यांची कोणतीही सबब ते पुढे करीत नसते. 1986 साली पार्ले येथील अखिल भारतीय ज्ञातीपरिषदेतही मंडळाने आपले प्रतिनिधित्व केले. त्याचवेळी मुलुंड येथे मंडळाचे दोन दिवसांचे भरगच्च स्नेहसंमेलन भरविण्यात आले. या कामी श्री. उल्हास द. प्रधान (सध्या पुणे येथे वास्तव्य) यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची व सांघिक खेळाची जबाबदारी उत्कृष्टपणे व कल्पकतेने पार पाडली. त्याचवेळी प्रथम दिवशी (उद्घाटनाचे दिवशी) ज्ञातीतील संत कै. गजाननमहाराज पट्टेकर व लोकसत्ताचे माजी संपादक श्री. माधव गडकरी यांनी अतिथीपद भूषविले. दुसऱया दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सौ. वैशाली कुळकर्णी दिग्दर्शित दुर्गा झाली गौरी या उत्कृष्टपणे सादर केलेल्या बालनाट्याची प्रशंसा त्यावेळचे प्रमुख अतिथी, उत्कृष्ट अभिनेते श्री. किशोर प्रधान यांनी केली. मध्यवर्ती संस्थेने स्थापन केलेल्या पूर्व विभागात (चेंबूर ते कर्जत) यावर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. नारायण रा. उर्फ नानासाहेब रणदिवे हे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. मंडळाचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष श्री. भालचंद्र ग. उर्फ भाईसाहेब प्रधान यांचे सहकार्यामुळे व ना. रा. रणदिवे यांचे पुढाकाराने उपवन येथे पूर्व विभगाचे 2 दिवसांचे स्नेहसंमेलन घेण्याचा बेत निश्चित झाला व अल्पावधीतच चां. का. प्रभु सध्या मुलुंडचे सर्वाधिक सहकार्यालने भिवंडी येथे थाटामाटाने दोन दिवसाचे स्नेहसंमेलन साजरे केले. मंडळाचे एक कष्टाळू पण प्रसिध्दी पराङमुख कार्यकर्ते म्हणून श्री. दिनेश शंकर पालकर यांचाही उल्लेख आवर्जून करणे भाग आहे की सहलीचे वेळी खास तयार होणारे कायस्थी मटण व कोजागिरीचे वेळी तयार होणारे उत्कृष्ट मसाल्याचे दूध याची संपूर्ण जबाबदारी ते मोठ्या आवडीने पार पाडीत असत. त्यांना त्यावेळी कोणताच कमीपणा वाटत नसे. मंडळामध्ये स्वखुशीने सामील झालेले व उत्साहाने सर्व ठिकाणी सहभागी होणारे तरुण कार्यकर्ते श्री. अजित सु. ताम्हाणे (सध्या ठाणे येथे वास्तव्य) यांचा उल्लेख करण्याचे कारण की घरोघरी जाउढन वेळच्यावेळी पत्रके वाटण्याचा व वर्गणी जमा करण्याचा कार्यक्रम ते आनंदाने पार पाडीत व त्यांना दिलेले काम ते अत्यंत जबाबदारीने करीत असत. मान्यवर नाटककार वास्तू का झाली नाही असा प्रश्न मंडळात नवीन आलेल्या ज्ञातीबांधवांना पडेल. पण त्यासाठी प्रयत्न झाले नाहीत असा गैरसमज कुणीही करु नये म्हणून पुढील व्यक्तींचा उल्लेख आवर्जून करीत आहोत. माजी अध्यक्ष ऍड. कै. शरद लक्ष्मण दिघे तसेच माजी अध्यक्ष भा. ग. उर्फ भाईसाहेब प्रधान यांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी पहाणी करुन वास्तुसाठी प्रयत्न केले. माजी कार्याध्यक्ष अनंत पु. भावे व माजी उपाध्यक्ष श्रीमती शैलजा शरद दिघे यांनी सरकारी कोट्यातून जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले.आर्किटेक्ट श्री. राजन टिपणीस यांनीही वास्तूचे निर्मितीसाठी सहकार्य दिले. मंडळाने इमारत समितीचीही निर्मिती केली होती. 1988 साली मंडळाचे प्रथम विश्वस्त श्री. भालचंद्र ग. उर्फ भाईसाहेब प्रधान, डॉ. अरविंद म. प्रधान व श्री. विलास माणिक हे निवडून आल्यामुळे इमारत समिती बरखास्त करुन सर्व अधिकार विश्वस्तांना सुपूर्द केले गेले. मंडळाने दिलीप रा. कर्णिक माजी कोषाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचे नेर्तृत्वाखाली ज्ञातीतील व ज्ञातीबाहेरील होतकरु तरुण तरुणींसाठी बँक मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. शिबीरास अत्यंत उत्तम प्रतिसाद लाभला होता. श्री. दिलीप कर्णिक यांचे स्नेही श्री. विजय माने, डॉ. बूच, श्री. कारेकर या मान्यवरांनी शिबीरास मार्गदर्शन केले. तया शिबीराची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी श्री. विजय माने यांनी समर्थपणे सांभाहली. मध्यवर्तीमध्ये मंडळाचे माजी कार्याध्यक्ष श्री. मो. प. नाचणे व श्री. ना. रा. रणदिवे पदाधिकारी म्हणून निवडले गेले. तसेच स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी आमदार श्री. दत्ताजी ताम्हणे यांचे नाव मंडळाने अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून सुचविले आणि श्री. दत्ताजी ताम्हणे हे अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की काही अपरिहार्य कारणामुळे स्थगित झालेले मंडळाचे महिला विभागाचे कार्य सौ. माधुरी सुळे व सौ. चित्रा बेंद्रे यांचे परिश्रमाने पुन्हा सुरु झाले. मंडळातर्फे काही वर्षे ना नफा ना तोटा या तत्वावर किराणा माल इत्यादी सामान सभारंभासाठी खरेदी केले जात असे पण केवळ जागेअभावी हे कार्य खंडित करावे लागले. मंडळाने ज्ञातीतील गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरून परत बोलीचे तत्वावर पुस्तके देण्याचा उपक्रम चालविला. त्याचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. मंडळाने दोन-तीन वेळा आजी माजी कार्यकर्त्यांचा मेळावा भरवून दोन पिढ्यांमधील दरी कमी करण्याचा इमानेइतबारे प्रयत्न केला. मंडळाच्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर आपली उपस्थिती लावून गेले व कार्यक्रमांचे भूषण वाढविले. श्री. भा. ग. प्रधान यांनी प्रथम आश्रयदाता सभासद होऊन एक आदर्श पायंडा पाडला. श्री. विंझाई देवस्थान मंडळातर्फे चालविण्यात येणाऱया वधु-वर सूचक मंडळास चां. का. प्रभु मंडळाने सहाय्य करावे असे आवाहन श्री. भा. ग. भाईसाहेब प्रधान यांनी करताच संयुक्तरित्या वधुवर सूचक मंडळ कार्यान्वित झाले. सर्वश्री श्री. भाईसाहेब प्रधान, य. का. गडकरी, वि. ना.वढावकर, सौ. माधुरी सुळे, सौ. मोकाशी, सौ. ज्योती फडणीस यांनी मंडळातर्फे या वधू वर सूचक मंडळाचे कार्य चालू ठेवले आहे. मंडळाने काही काळ एस.एस.सी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शैक्षणिक वर्ग चालविण्याचाही प्रयत्न केला. माजी अध्यक्ष श्री. नाथ ताम्हणे यांनी या वर्गाकरिता पुष्कळ प्रयत्न केले. 1991-92 साली बरेच अनुभवी कार्यकर्ते निवृत्त झाले. नंतर चार वर्षे श्री. प्रकाश राजे यांनी कार्याह पदाची धुरा सांभाळली. त्यांनी जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची विचारांची दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विशेष म्हणजे 50 टक्के महिला कार्यकारिणीवर निवडून आल्या. या चार वर्षात श्री. आनंद उर्फ आप्पा देशमुख, श्री. नाथ ताम्हणे व डॉ. उल्हास प्रधान यांनी अध्यक्षपद भूषविले. या काळात कार्यकारिणीने तहहयात सभासद नोंदविण्याची मोहिम हाती घेऊन तहहयात सभासदांची संख्या 93 वरुन 275 तर आश्रयदात्यांची संख्या 5 वरुन 11 पर्यंत नेली. अलीबाग येथे आयोजित केलेल्या सहलीत 120 लोकांनी भाग घेतला. युवकांसाठी केळवे माहिम येथे सहल आयोजित केली. कोजागिरी समारंभात बक्षिसांची संख्या व रक्कम वाढविली. या वर्षीपासून कै. चिंतामणराव देशमुख जन्मशताब्दीचे औचित्य साधून मंडळातर्फे त्यांच्या नावे, मुलुंड मध्ये एस.एस.सी. परीक्षेत प्रथम आलेल्या कोणत्याही ज्ञातीच्या विद्यार्थी / विद्यार्थीनीस रु. 251/- चे पारितोषिक सुरु केले. दि. 25 जानेवारी 1996 रोजी रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन सुप्रसिध्द वास्तुविशारद श्री. शशिकांत डोंगरे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी सुप्रसिध्द लेखक, कवी व गीतकार श्री. प्रविण दवणे यांचा दिलखुलास कार्यक्रम झाला.