मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
जाहिरात
 
 
साहित्य
 
आज महिला दिन. आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या आपल्या ज्ञातीतील काही थोर स्त्री व्यक्तिमत्वांची या महिला दिनाच्या निमित्ताने मला आठवण झाली. त्यातील काही थोर महिलांचा व त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्याचा थोडक्यात परिचय आपल्याला व विशेषतः आपल्यातील तरुण पिढीला व्हावा या करिता मी या ठिकाणी देत आहे अवश्य वाचावा .

परमपूज्य जानकीदेवी शांताराम सुळे (चित्रे -देशमुख) :- अंगी अलौकिक असे दैवी सामर्थ्य होते.या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी समाजातील रंजले गांजलेल्या लोकांची आयुष्यभर सेवा केली.त्या त्रिकालज्ञानी होत्या. संतपदी पोहोचलेली एक कायस्थ स्त्री म्हणुन आजही त्यांची अनेक कुटुंबात एखाद्या देवी प्रमाणे पूजा केली जाते.

डॉ.सुमन चिटणीस (रणदिवे) - एस एन डी टी - महिला विद्यापीठाच्या माजी उपकुलगुरू :- १ डिसेम्बर १९८९ रोजी महिला विद्यापीठाच्या उपकुलगुरू पदी निवड.अतिशय हुशार व थोर विदुषी.अनुसूचित जाती जमातीच्या शैक्षणिक समस्या या विषयावर महत्वाचा प्रबंध. एस एन डी टी - महिला विद्यापीठाच्या उपकुलगुरूपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या मराठी महिला.

पद्मभूषण डॉ .कमल रणदिवे :- १९५१ ते १९८७ या काळांत कॅन्सर सारख्या रोगावर अतिशय महत्वाचे संशोधन. ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर अतिशय महत्वाच्या प्रबंधाचे लेखन.रॉकफेलर शिष्यावृत्तीने सन्मानित.१९८२ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव.

मृणाल गोरे (मोहिले) : समाजवादी विचारसरणीच्या या देशांतील एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या.पाणीवाली बाई या नावाने गोर गरीब,दिन दुबळ्या वर्गांत प्रसिद्ध

अहिल्या रांगणेकर (रणदिवे) :- :साम्यवादी विचारसरणीच्या या देशांतील एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या.लढाऊ वृत्तीच्या जेष्ठ राजकीय सामाजिक कार्यकर्त्या.गोर गरीब,दिन दुबळ्या वर्गांत प्रसिद्ध. गिरणी कामगारांचे व महिलांचे नेतृत्व.

डॉ .इंदुमती पारीख (रणदिवे) :- झोपडपट्टीतील महिला व मुले यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अहोरात्र कार्य.स्त्रीहीताकारिणी या संस्थेची स्थापना. मनुष्य हिताकरिता झटणारी महिला म्हणून अमेरिकेतर्फे १९८८ साली गौरव.

चंपा लिमये (गुप्ते) :- जेष्ठ समाजवादी नेते मधु लिमये यांच्या पत्नी. प्रत्येक चळवळीत मधु लिमये यांच्या बरोबर आघाडीवर. स्त्री जीवन व या देशांतील स्त्रियांच्या समस्या यांचा विशेष अभ्यास. मधु लिमये यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावर अप्रतिम पुस्तकाचे लेखन.

अभिनयाच्या क्षेत्रांतील कायस्थ महिला :-
शोभना समर्थ ,स्नेहप्रभा प्रधान,नूतन,इंदिरा चिटणीस, नलिनी जयवंत,तनुजा, विजया मेहता (जयवंत), या कायस्थ महिलांनी हिंदी -मराठी चित्र सृष्टीवर व नाट्य सृष्टीवर त्या त्या काळांत आपल्या अभिनयांतील सामर्थ्याच्या जोरावर अक्षरशः राज्य केलेले आहे.
खर तर वर उल्लेख केलेल्या या प्रत्येक कायस्थ महिला अभिनेत्रीच्या नाट्य चित्र क्षेत्रांतील अभिनयाच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा लेखा जोगा हा त्या त्या प्रत्येकीवर लिहिता येण्यासाखा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

असो. या व्यतिरिक्तही अनेक कायस्थ महिला समाजांतील विविध क्षेत्रांत आजही आघाडीवर राहुन कार्य करीत आहेत.या सगळ्यांची माहिती एकत्रित देणे शक्य नाही. प्रसंगानुरूप अशी माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन.आपल्याला जर देश विदेशातील अशा कोणा कायस्थ महिलेच्या महत्वपूर्ण कार्याची माहिती असेल तर ती ज्ञातिबांधवांच्या माहितीकरिता या संकेतस्थळाच्या माध्यमातुन अवश्य प्रसिद्ध करावी.

महिला दिनाच्या निमित्ताने वर उल्लेख केलेल्या या सर्व महान कायस्थ महिलांच्या अजोड कर्तुत्वाला माझा सलाम……!!!