मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
चैत्रावली मंडळ
मंडळा विषयी
कार्यकारी मंडळ
कार्यक्रम
छायाचित्र
 
 
मंडळा विषयी

श्री चैत्रावली महिला मंडळ ही चां. का. प्रभु समाजोन्नती मंडळाची महिला शाखा असूनही स्वतचा कारभार स्वतंत्ररित्या गेले अनेक वर्ष सांभाळत व कार्यरत करीत आहे.

महिन्यातला प्रत्येक शुक्रवार हा विशिष्ट उपक्रमासाठी आम्ही ठेवला असल्यामुळे प्रत्येक शुक्रवारचा विषय आमच्या भगिनींना कळण्यास सुलभ जाते.

महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिशी, सहल, वर्गणी, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात.

दुसऱया शुक्रवारी खेळ, कथा वान घेण्यात येते. याशिवाय आषाढी एकादशीला रिंगण व विठ्ठलाच्या नामघोषाने सभागृह दुमदुमून जाते. श्रावणी शुक्रवारचे, संक्रांतीचे, चैत्रगौरीचे हळदीकुंकू थाटात साजरे केले जाते. नवरात्रीतील भोंडल्यला मधोमध पाटावर समजवून ठेवलेल्या हत्ती भोवती फेर धरुन जुनी नवी भोंडल्याची गाणी म्हणत अतिशय उत्साहाने भाग घेऊन भगिनी आनंद लुटतात व निरनिराळ्या खिरापतींचा आस्वाद घेऊन तृप्त मनाने घरी जातात.

तिसऱया शुक्रवारी बाहेरील तज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांच्या क्षेत्रातील सखोल माहिती भगिनींना देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ह्या वर्षात अनेक व्यक्तींकडून आम्हांला बौध्दिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, वास्तुशास्त्र, मनोरंजन, कलात्मक, सामाजिक, पौराणिक अशा विविध क्षेत्रातील अनोळखी माहिती उपलब्ध झाली. उदा. 1) श्रीमती अनुराधा बेके यांचे नारद या विषयावर विवेचन, 2) श्री. शिरीष कुळकर्णी यांचे वास्तुशास्त्र या विषयावर मार्गदर्शन, 3) श्रीमती शिल्पा गोखले यांचा त्रिपुरारी पौर्णिमा यावर कथात्मक कार्यक्रम, 4) श्रीमती अलका वढावकर यांचा मनातील गाणी हा काव्यमय कार्यक्रम, 5) श्री. डी. व्ही. कुळकर्णी यांचा विज्ञान कथा हा विज्ञान विषयावर रंजक कार्यक्रम. अशा मान्यवरांनी आम्हांला माहिती पुरविली.

चौथ्या शुक्रवारी कार्यकारिणीची सभा घेऊन पुढील महिन्याचे कार्यक्रम ठरवले जातात. मंडळाचे सर्व कार्यक्रम नियोजनबध्द असून सर्वांचा सहभाग त्यास लाभावा याकडे अधिक लक्ष दिले जाते. कधी कधी पाचवा शुक्रवार आता तर चौथ्या शुक्रवारी खेळ, कथा वाचन अथवा गोष्टी सांगून पाचव्या शुक्रवारी कार्यकारिणीची सभा घेण्यात येते.

सर्व सभासदांना एकत्र येण्यासाठी व स्वच्छंदपणे आनंद लुटण्यासाठी एखादी सहल आयोजित करण्यात येते. यंदा मंडळाच्या सभासद श्रीमती अंजली कारखानीस यांच्या डोंबिवली येथील बंगल्यावर सहल नेण्यात आली. फिरणे, देवदर्शन, उत्तम जेवण व खेळ यामुळे भगिनींनी सहलीचा आनंद लुटला. दरवर्षी मे महिन्यात आम्ही आमच्या मंडळाचा वर्धापनदिन कालिदास येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. त्यात आमच्या सर्व भगिनी उत्साहाने भाग घेऊन छोट्या नाटिका, गाणी, कविता अशा विविध कला सादर करुन आनंद लुटतात. यावर्षीही 6 मे 2012 रोजी कालिदास कॅफे, मुलुंड येथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे अध्यक्षपद श्रीमती प्रभाताई देशमुख यांनी भुषविले होते. त्या मुलुंड केंद्राच्या स्वाधार या संस्थेच्या संचालिका आहेत. त्यांच्या हस्ते 60 वर्षे व 75 वर्षे पूर्ण झालेल्या महिला तसेच ज्येष्ठ भगिनींचा सत्कार करण्यात आला. वर्षभरात झालेल्या स्पर्धांमध्ये भगिनींनी मिळविलेल्या यशाचे कौतुक म्हणून प्रत्येकीचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. काही भगिनींनी छोट्या नाटिका सादर केल्या. आपली कला दाखविण्यासाठी श्री चैत्रावली महिला मंडळ भगिनींना अशा प्रकारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देते. ह्यामुळे स्नेहांकितातर्फे दरवर्षी होणाऱया उपक्रमात आमचे कलाकार भाग घेऊन विविध बक्षिसे मिळवतात.

यावर्षी श्री. दत्ताजी ताम्हणे यांनी 100व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मडळातर्फे त्यांचा सन्मान पारंपारिक पध्दतीने करण्यात आला. 5 सुवासिनींकडून 101 ज्योतीने त्यांचे औक्षण करण्यात आले व त्यांच्या आवडीचे त्यांनी सांगितलेले खास पदार्थ तेलपोळी, खीर, कानवला, पंचामृत आमच्या भगिनींनी आवर्जून करुन आणले होते. संपूर्ण कार्यक्रम वेळेत व धुमधडाक्यात पार पडला.

चौथा शुक्रवार सोडला तर इतर शुक्रवारी साधारण 40/50 भगिनींची उपस्थिती असते. कधी कधी हॉल अपुरा पडून बाहेर उभे रहावे लागते.

2011 च्या दहावीच्या परिक्षेत प्रतिकुल परिस्थितीमध्ये सुध्दा उज्ज्वल यश संपादन करणाऱया कु. श्वेता सावंत हिला चैत्रावली महिला मंडळातर्फे रु. 1000/- चा धनादेश म. टा.कडे पाठविण्यात आला. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन आमचे मंडळ नेहमीच मदत करीत असते.

यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे स्नेहांकिताने कार्यालयीन जबाबदारीची धुरा दोन वर्षासाठी श्री चैत्रावली महिला मंडळावर सोपविली आहे. त्यामुळे आता मंडळाची जबाबदारी खूपच वाढली आहे.

नवीन इच्छुक होणाऱया सभासदांनी आमच्या खालील कार्यकारीणीच्या कोणत्याही पदाधिकाऱयाशी संपर्क साधावा.

अध्यक्ष : श्रीमती नीला प्रधान   9869713920
कार्याध्यक्ष : सौ. भारती पोतनीस  9967158321
कार्यवाह : सौ. पल्लवी लिखिते 25675705
कोषाध्यक्ष : सौ. सुनिता दिघे  9920105920

 
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12