मासिक कार्यक्रम - ज्योतिष
मे महिन्याच्या सुट्टीनंतर जून महिन्यात श्री चैत्रावली मंडळाचे कार्यक्रम पुन्हा सुरु झाले. मंडळ सुरु झाल्याच्या आनंदाला एक दुख्खाची किनार अशी होती ती म्हणजे मंडळाच्या उत्साही व सदा हसतमुख अश्या सहकोशाध्याक्षा सौ. विनिता प्रधान ह्यांच्या निधनाची! विनिताला श्रद्धांजली वाहूनच मंडळाच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली.
दि. 21 जून रोजी मंडळात ज्योतिष तज्ञ सौ. वैशाली सांगलीकर यांचा 'ज्योतिष' ह्या विषयावर कार्यक्रम झाला. फळ्यावर पत्रिकेचे रेखाटन करून त्यातील घरांच्या क्रमांकाचे व त्या क्रमांकातील घरात असणाऱ्या ग्रहांचे महत्व त्यांनी विशद करून सांगितले. पत्रिकेतील ग्रहांच्या स्थानांवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, आवड, त्याचे घरातल्या व्यक्ती बरोबरचे संबंध तसेच कोणत्या विषयात प्राविण्य मिळू शकेल ह्या सर्व गोष्टी कश्या समजतात ते वैशाली ताईंनी सांगितले. जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे भगिनी कार्यक्रम ऐकताना अगदी रंगून गेल्या होत्या. अनेक भगिनींनी आपल्या मनातील प्रश्न विचारून शंका निरसनही करून घेतले. हा कार्यक्रम सर्वांना खूपच आवडला. |