मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
स्फुर्तीस्थान
दैवते
महान व्यक्ती
मुलुंडचे गुणवंत
 
 
 
 
महान व्यक्ती

 

श्री. शिवछत्रपतींच्या स्वराज्यस्थापनेत कायस्थ प्रभु ज्ञातीचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे.हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना सर्वोतपरी मदत करणार्या आणी प्रसंगी बलिदान करणार्या ज्या ज्ञाती होत्या त्या मध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञाती ही अग्रस्थानी होती. शिवशाहीसाठी कायस्थ वीरांनी फार मोठे आत्मसमर्पण केले असे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने यातील काही कायस्थ वीरांची थोडक्यात माहीती.

1. शिवाजीराजांना रायरेश्वराच्या देवळात दूधभात व बेलभंडारा उचलुन हजार बाराशे मावळयांसह हिंदवी स्वराज्याची प्रेरणा व शपथ देणारे होते - दादाजी नरसप्रभु देशपांडे-कुलकर्णी गुप्ते.

2. रानोमाळी फिरुन आदिलशाहींतील हजारो सैनिकांचे आपल्या गोड वाणीने मन वळवुन मुसलमानी अधिपत्याखालील अनेक गडकरी व हत्यारबंद सैनिक शिवाजी राजांना स्वराज्याच्या कामी मिळवुन दिले ते ह पिलाजी दुर्वे व त्यांचे बंधु यमाजी मावजी प्रभु दुर्वे यांनी.

3. छत्रपतींचे सचिव व अत्यंत विश्वासु सहकारी होते बाळाजी आवजी चिटणीस.हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत बाळाजींचा ात्यंत महत्वाचा वाटा होता.ते छत्रपतीचे अत्यंत एकनिष्ठ असे सेवक होते.

4. शिवाजीराजांचे अनेक गड बांधणारे दुर्गकार होते पद्मदुर्गकार मल्हारराव नारायण चौबळ (चेउलकर)

5. शिवाजी राज्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते विश्वासराव बाबाजी दिघे – देशपांडे.यांना अनेक भाषा अवगत होत्या.

6. छत्रपती शिवरायांचे वकील उर्फ पारसनीस होते निळकंठ उर्फ निळो येसाजी प्रभु – पारसनीस. या पारसनीसांना मराठी,हिंदी,संस्कृत,पर्शियन,उर्दु,मागधी,पाली,तेलगु,द्राविडी इतक्या भाषांचे उत्तम ज्ञान होते असे सेतुमाधवराव पगडी यांनी त्यांच्या शिवाजी या इंग्रजी पुस्तकांत लिहिले आहे.

7. छत्रपतींच्या आज्ञेवरुन कल्याणचा खजिना लुटुन महाराजांच्या चरणी अर्पण करणारे होते..कर्णिक..देशपांडे..तोरणेकर व राजमाचीकर हे सगळे कायस्थ होते.

8. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक दलाजे प्रमुख होते गंगो भंगाजी वाकनीस – प्रधान. गंगो भंगाजी वाकनीस इतके शूर होते की,त्यांच्या या अंगरक्षक दलाची ख्याती व विशेषत: गंगो भंगाजी यांची भिती अगदी औरंगजेबालाही होती असे इतिहासात सांगितलेले आहे.

9. किल्ले रायगडचे पोतनीसी मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज पोतनीस यांच्याकडे होती.

10. दादाजी रघुनाथ प्रभु देशपांडे – महाडकर हे शूर सरदार होते व शिवाजी राजे त्यांना घेतल्याशिवाय कोणत्याही मोहिमेस जात नसत.

11. पुरंदर या महत्वाच्या किल्लयाचे किल्लेदार होते शूर वीर सरदार मुरारबाजी देशपांडे. घनघोर युध्दानंतरही मोगल सरदार दिलेरखान याला त्यांनी किल्ला दिला नाही.मुरारबाजी या लढाईत धारातिर्थी पडले पण किल्ला पडला नाही.

12. विररत्न बाजी प्रभु देशपांडे हे शिवाजी राजांचे प्रमुख सरदार होते.महाराज विशालगडाकडे जातांना मोगलांविरुध्द घोडखिंडीतील त्यांनी दिलेली पावन लढत जगभर प्रसिध्द आहे.

13. बाजीप्रभु देशपांडे – प्रधान हे जसे कसलेले योध्दे होते तयाचप्रमाणे ते एक कुशल असे स्थापत्यशास्त्रज्ञ होते हे सांगुनही कोणाला खरे वाटणार नाही.पण इतिहास सांगतो की बाजी प्रभु यांना स्वराज्याच्या 27 गडांची डागडुजी करण्याचे व पुनर्बांधणी करण्याचे अत्यंत महत्वाचे असे काम महाराजांनी त्यांना दिले होते.याचा उल्लेख बखरीत केलेला आहे.

14. शिवाजी राजांचे राज्याभिषेकाप्रसंगी 32 मणस सोन्याचे सिंहासन बनविले होते अण्णो दत्ताजी चित्रे यांनी.

असे हे महान कायस्थ वीर. या व्यतिरीक्तही अनेक कायस्थ प्रभु वीरांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी महाराजांना एकनिष्ठेने मदत केली. महाराजांचा कायस्थांवर प्रचंड विश्वास होता. शिवाजी महाराजांनी आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ कायस्थ ज्ञातीविषयी काढलेले गौरवोद्गार इतिहासात नोंदविलेले आहेत.महाराज म्हणत ….

""प्रभुंची जात सदैव विश्वासपात्र जात आहे. ते विश्वासाने काम करितात.प्रसंगी आपल्या धन्यासाठी प्रभु लोक आपले प्राणही खर्ची घालण्यास मागे पुढे पहात नाहीत."

हिंदवी स्वराज्यासाठी कायस्थांनी केलेल्या या त्यागाला स्मरुन प्रबोधनकार ठाकरे यांनी एक कवीता लिहिली होती त्यातील एक कडवे असे होते…..

राज्य मर्हाठी श्री.शिवबांचे का कायस्थांचे
कायस्थांच्या रक्तावरती बुरुज उभे त्यांचे,
ज्या राज्याची प्राणप्रतीष्ठा कायस्थे केली,
अवतारी शिवमुर्ती मग वरती स्थापन झाली…..

धन्य धन्य ते तमाम कायस्थ वीर !! आपल्या ज्ञातींतील या शूर वीरांची येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने एक आठवण करुन देण्याचा माझा हा एक अल्पसा प्रयत्न !!
 
 

आज मी या ठिकाणी या सगळ्या सुप्रसिद्ध कायस्थ स्त्री -पुरुषांची यादी देणार नाही, पण आजच्या या दिवशी फक्त दोन कायस्थ व्यक्तिमत्वांच्या अतुलनीय कामगिरीचा आपल्याला अभिमान वाटेल अशी माहिती व एक अमुल्य अशी आठवण छायाचित्राच्या रूपाने दाखवीत आहे.

मित्रहो,या देशाच्या रिझर्व बँकेचे जे तीन मराठी गव्हर्नर होऊन गेले त्यातील अभिमानाची बाब म्हणजे दोन कायस्थ होते. पहिले डॉ. सी.डी.देशमुख व दुसरे के.जी .आंबेगावकर. ( व आपल्या माहिती करता यातील तिसरे होते बी.एन .आडारकर ). यातील डॉ. सी.डी .म्हणजे चिंतामणराव देशमुख यांचा कार्यकाळ हा ११ ऑगस्ट १९४३ ते ३० जून १९४९ असा होता. तर के.जी .आंबेगावकर यांचा कार्यकाळ हा १४ जानेवारी १९५७ ते २८ फेब्रुवारी १९५७ असा फक्त ४५ दिवसांचा होता. अर्थातच डॉ.चिन्तामणराव देशमुख आपल्या सगळ्यानाच परिचित आहेत. पण के.जी .आंबेगावकर हे सुद्धा एक मोठे अर्थतज्ञ होते व त्यांनी काही काळ भारताचे अर्थ सचिवपदही भूषविलेले होते.

पण यात सगळ्यात भाग्याची बाब व त्यातही आपल्या तमाम कायस्थ ज्ञातीला अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे , डॉ. सी.डी.देशमुख व के.जी .आंबेगावकर या दोघांनीही रिझर्व बँकेचे गव्हर्नर या नात्याने भातीय चलनावर स्वाक्षरी केली होती. या दोघांनीही स्वाक्षरी केलेल्या पाच रुपये व एक रुपया अशा दोन दुर्मिळ नोटांची छायाचित्रे मी या ठिकाणी आपल्या माहितीकरिता व बघण्याकरिता देत आहे.या नोटा व त्यावरील आपल्या या दोन ज्ञातिबांधवांच्या स्वाक्षर्या पाहूनव्यक्तिश: मला मराठी बरोबरच मी कायस्थ असल्याचा खूपच अभिमान वाटला. मला वाटते या नोटा बघितल्यावर आपल्याला पण असा अभिमान नक्कीच वाटेल.......!

 

परमपूज्य जानकीदेवी शांताराम सुळे (चित्रे -देशमुख) :- अंगी अलौकिक असे दैवी सामर्थ्य होते.या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी समाजातील रंजले गांजलेल्या लोकांची आयुष्यभर सेवा केली.त्या त्रिकालज्ञानी होत्या. संतपदी पोहोचलेली एक कायस्थ स्त्री म्हणुन आजही त्यांची अनेक कुटुंबात एखाद्या देवी प्रमाणे पूजा केली जाते.

डॉ.सुमन चिटणीस (रणदिवे) - एस एन डी टी - महिला विद्यापीठाच्या माजी उपकुलगुरू :- १ डिसेम्बर १९८९ रोजी महिला विद्यापीठाच्या उपकुलगुरू पदी निवड.अतिशय हुशार व थोर विदुषी.अनुसूचित जाती जमातीच्या शैक्षणिक समस्या या विषयावर महत्वाचा प्रबंध. एस एन डी टी - महिला विद्यापीठाच्या उपकुलगुरूपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या मराठी महिला.

पद्मभूषण डॉ .कमल रणदिवे :- १९५१ ते १९८७ या काळांत कॅन्सर सारख्या रोगावर अतिशय महत्वाचे संशोधन. ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर अतिशय महत्वाच्या प्रबंधाचे लेखन.रॉकफेलर शिष्यावृत्तीने सन्मानित.१९८२ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव.

मृणाल गोरे (मोहिले) : समाजवादी विचारसरणीच्या या देशांतील एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या.पाणीवाली बाई या नावाने गोर गरीब,दिन दुबळ्या वर्गांत प्रसिद्ध

अहिल्या रांगणेकर (रणदिवे) :- :साम्यवादी विचारसरणीच्या या देशांतील एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या.लढाऊ वृत्तीच्या जेष्ठ राजकीय सामाजिक कार्यकर्त्या.गोर गरीब,दिन दुबळ्या वर्गांत प्रसिद्ध. गिरणी कामगारांचे व महिलांचे नेतृत्व.

डॉ .इंदुमती पारीख (रणदिवे)
:- झोपडपट्टीतील महिला व मुले यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अहोरात्र कार्य.स्त्रीहीताकारिणी या संस्थेची स्थापना. मनुष्य हिताकरिता झटणारी महिला म्हणून अमेरिकेतर्फे १९८८ साली गौरव.

चंपा लिमये (गुप्ते) :- जेष्ठ समाजवादी नेते मधु लिमये यांच्या पत्नी. प्रत्येक चळवळीत मधु लिमये यांच्या बरोबर आघाडीवर. स्त्री जीवन व या देशांतील स्त्रियांच्या समस्या यांचा विशेष अभ्यास. मधु लिमये यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावर अप्रतिम पुस्तकाचे लेखन.

अभिनयाच्या क्षेत्रांतील कायस्थ महिला :-
शोभना समर्थ ,स्नेहप्रभा प्रधान,नूतन,इंदिरा चिटणीस, नलिनी जयवंत,तनुजा, विजया मेहता (जयवंत), या कायस्थ महिलांनी हिंदी -मराठी चित्र सृष्टीवर व नाट्य सृष्टीवर त्या त्या काळांत आपल्या अभिनयांतील सामर्थ्याच्या जोरावर अक्षरशः राज्य केलेले आहे.

खर तर वर उल्लेख केलेल्या या प्रत्येक कायस्थ महिला अभिनेत्रीच्या नाट्य चित्र क्षेत्रांतील अभिनयाच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा लेखा जोगा हा त्या त्या प्रत्येकीवर लिहिता येण्यासाखा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.