मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
कार्यक्रम
नजिकच्या काळातले
कोजागिरी पोर्णिमा
कुंकुमार्चन
गडकरी पुण्यतिथी
विद्यार्थी सत्कार
स्नेहसंमेलन
सामुदाईक सहल
सामुदाइक व्रतबंध सोहोळा
 
 
 
 
गडकरी पुण्यतिथी

दरवर्षी 23 जानेवारी रोजी होणारी ``गडकरी पुण्यतिथी’ गेले अनेक वर्षे नित्यनेमाने पार पडत आहे. त्यांच्या प्रतिमेला हार घालून एखाद्या वक्त्यातर्फे गडकऱयांचया वाङ्मयाविषयी व्याख्यान ठेवले जाते. त्यांच्या नाटकातील गीते अथवा प्रसंगसुध्दा सादर केले जातात. त्या निमित्ताने यंदा असा एक मानस आहे की मुलुंडमधील आपल्याच ज्ञातीबांधवांपैकी ज्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत अथवा जी व्यक्ती स्तंभलिखाण करते त्यांना बोलावून त्यांचे विचार लोकांपुढे मांडावेत. त्यामुळे त्यांच्या साहित्याची ओळख होईल आणि त्यांचे सुप्त लिखाणही उजेडात येऊन त्यांचा उत्साह द्विगुणीत होईल. दसरा, दिवाळी पहाट, गुढीपाडवा ह्या सणांनासुध्दा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. कारण हल्ली जागोजागी हे प्रकार होत असतात. दरवाजाला नुसते तोरण बांधून एखादा उपक्रम राबविला म्हणजे मनाला रुचत नाही. अशावेळी आपल्याच बांधवांकडून त्यांचे काव्य गायन, परिसंवाद अथवा साहित्य परिचय घडवून आणले तर दोन्ही गोष्टी एकाचवेळी साध्य होण्याची शक्यता आहे. वाचकांनी ह्याबद्दल आम्हांला मार्गदर्शन अथवा सूचना कराव्यात.