मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
कार्यक्रम
नजिकच्या काळातले
कोजागिरी पोर्णिमा
कुंकुमार्चन
गडकरी पुण्यतिथी
विद्यार्थी सत्कार
स्नेहसंमेलन
सामुदाईक सहल
सामुदाइक व्रतबंध सोहोळा
 
 
 
कुंकुमार्चन
 

दिनांक २८ ऑगस्ट रोजी आमच्या सीकेपी मंडळ मुलुंड चा कुंकुमार्चन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गेली ७ वर्षे आम्ही या सोहळ्याचे यशस्वीपणे आयोजन करीत आहोत. यंदाच्या वर्षी देखील तश्याच उत्साहात कुंकुमार्चन सोहळा पार पडला. सुमारे ५० सुवासिनी या सोहळ्या यंदा उपस्थित होत्या तसेच प्रसादासाठी देखील २५ सभासद उपस्थित होते.

श्रावण महिन्यात मुख्यत्वेकरून अनेक सण आपण साजरे करत असतो. याच महिन्यात आम्ही कुंकुमार्चन सोहळा आयोजित करीत असतो. प्रथम गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गणेश पूजनाने या पूजेची सुरुवात केली जाते. आमच्यातीलच एका दाम्पत्याला हा गणेश पूजनाचा मान दिला जातो. यंदा आमचे कार्याध्यक्ष श्री. पी. दि. कुळकर्णी व त्यांच्या पत्नी सौ. शलाका कुळकर्णी यांच्या हस्ते ही गणेश पूजन पार पडले. याच सोहळ्यात कु. तनया सुळे ही कुमारिका देखील उपस्थित होती म्हणून तीला देखील पूजले गेले व तिची सन्मानाने ओटी भरली गेली. नंतर गुरुजींनी सर्व उपस्थित सुवासिनींना आपल्या घरून आणलेल्या कुलास्वामिनिन्च्या मूर्तींवर विधीवत पूजन करण्यास सांगून कुंकुमार्चन सोहळ्यास आता आरंभ करूया असे सांगून देवीच्या सहस्त्र नामास सुरुवात केली. देवीच्या प्रत्येक नावाच्या बरोबर सुवासिनी चिमुटभर कुंकू आपल्या देवीवर वाहात होत्या. गुरुजींच्या धीरगंभीर व स्पष्ट उच्चारात देवींची सहस्त्र नामे कान आणि मन सुखावून जात होती.

सर्व सभागृह एका वेगळ्याच प्रसन्न वातावरणाने भारावून गेले होते. सुमारे तासभर चाललेल्या या सोहळ्यानंतर देवीची आरती म्हणून समारंभाची सांगता झाली. उपस्थित सर्वांनी गुरुजींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले व पुढील वर्षी परत या अशी विनंती गुरुजीना केली. यानंतर श्री. हेमंत रणदिवे यांनी सर्व उपस्थिताना आपल्या चविष्ट व रुचकर भोजनाने तृप्त केले आणि एक पवित्र असा सोहळा अनुभवला त्या आनंदात सर्वानी आपापल्या घरी प्रस्थान केले. या सोहळ्याची क्षणचित्रे आपल्या साठी पुढे देत आहे त्याचा आनद लुटावा हीच अपेक्षा.

धन्यवाद!

 
kk1 kk10 kk11 kk12 kk13 kk14 kk15 kk2 kk3 kk4 kk5 kk6 kk7 kk8 kk9
 
मंडळातर्फे दिले जाणारे पूजा साहित्य

कुंकू, पंचामृत, फळे, नारळ, गजरा, पेढे, खडीसाखर, कापूर, उदबत्ती, धूप, गंध, अक्षता, दुर्वा, बेल, तुळस, अत्तर, विड्यांची 10 पाने, 5 सुपाऱया, फुलवात, तूप.