20 सप्टेंबर 2008 रोजी 100 ज्ञाती बंधु भगिनींच्या उपस्थितीत विश्वस्त डॉ. उल्हास प्रधान व सौ. गीता उल्हास प्रधान यांच्या हस्ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दिलेल्या जागेवर गणेशपूजन झाले.
5 ऑक्टोबर 2008 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री. दत्ताजी ताम्हणे सभागृह असे नामकरण करुन एक सुंदर शिलालेख बसविण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायाधीश व माजी लोकपाल श्री. विजय टिपणीस यांच्या हस्ते ह्या भव्य सोहळ्याचे उद्घाटन झाले. मा.दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत आमदार तारासिंग ज्ञातीतील अनेक मान्यवर, नगरसेवक, सामाजिक संस्था हे सर्व ह्या सोहळ्यात सहभागी झाले होते. स्वतची एक वास्तू मंडळाला मिळाली. ह्या स्वप्नपूर्तीत जमलेल्या ज्ञातीबांधवांच्या चेहऱयावर एक अनोखा आनंद विराजला होता. सभासदांची उठबस होण्यासाठी, सभा घेण्यासाठी, मंडळाचे सामान ठेवण्यासाठी एक जागा उपलब्ध झाली होती.
तरी...
एक प्रश्न रेंगाळत होता. ही जागा जरी आम्हांला दिली गेली होती तिचे हक्क मात्र आमच्याकडे नव्हते आणि म्हणूनच ही जागा आमच्या स्वतच्या मालकीची नाही असे वारंवार वाटत होते. नवीन राबविले जाणारे उपक्रम त्या जागेत अपूरे पडू लागले. कार्यालय म्हणून त्याची निवड जरी योग्य असली आणि तात्पुरती का होईना जागेची सोय झाली असे भासत असले तरी स्वहक्काची एक वास्तू असावी ही तळमळ मात्र स्वस्थ बसू देईना. म्हणून मुलुंड मधल्या आमच्या ज्ञातीबांधवांना आम्हांला सारखे आवाहन करावे लागले. आजमितीस जागेचे वाढते भाव पहाता आमच्या गंगाजळीत सतत पैशाचा ओघ वहावा ही अभिलाषा उत्पन्न झाली. तसे प्रयत्न सुध्दा सुरु झाले. सरकारतर्फे काही मदत मिळते का म्हणून कागदोपत्री संधान साधले गेले. स्वतच्या वास्तुसंबंधी ध्येयपूर्तीचा ध्यास ठेवून कार्य करणे हाच एक उद्देश्य आज मनात साठवला आहे व त्या दिशेनेच आमची पावले पडत आहेत हे निश्चित. |