मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
कार्यक्रम
नजिकच्या काळातले
कोजागिरी पोर्णिमा
कुंकुमार्चन
गडकरी पुण्यतिथी
विद्यार्थी सत्कार
स्नेहसंमेलन
सामुदाईक सहल
सामुदाइक व्रतबंध सोहोळा
 
 
 
आगामी कार्यक्रम

 

"कायस्थ खाद्य-यज्ञ" टीमतर्फे सर्वांना अभिवादन! आधी कळवल्याप्रमाणे सर्वांच्या सोयीसाठी आपण २६-२७ नोव्हेंबरला ठरवलेल्या तारखा पुढे ढकलल्या होत्या. आणि आता आपणा सर्वांना कळविण्यास आम्हाला आनंद होत आहे की आपण ज्याची उत्कंठतेनी ज्याची वाट पहात आहात तो "कायस्थ खाद्य-यज्ञ" हा खाद्य महोत्सव आता १७ आणि १८ डिसेंबर २०१६ रोजी नवीन जागी, मोठ्या स्वरुपात, नव्या दिमाखात साजरा होणार आहे. ह्या खाद्य-यज्ञाद्वारे फक्त सीकेपी खाद्य संस्कृतीचीच नाही तर संपूर्ण सीकेपी जीवनशैलीची जगाला तोंडओळख करुन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, किंबहुना कायस्थ खाद्य-यज्ञाचे प्रयोजनच हे आहे. सीकेपी संस्कृती ही फक्त खाण्या-पिण्यापुरती मर्यादित नाही. राज्य-व्यवहार, अर्थकारण, व्यापार-उदीम, सैन्यदल, शिक्षणक्षेत्रापासून ते साहित्य,क्रिडा, संगीत, अभिनय अशा सर्व क्षेत्रांमध्ये कायस्थांचा लीलया संचार नेहमीच राहीला आहे. आणि ह्याचंच प्रतिबिंब कायस्थ खाद्य-यज्ञात पहायला मिळेल. त्यामुळे कायस्थ खाद्ययज्ञात आपल्या रसना-इंद्रियांना विविध शाकाहारी व मांसाहारी रुचकर पदार्थांद्वारे तृप्त करणाऱ्या ३० फूड स्टाल्सच्या बरोबरीने २४ बिझनेस स्टॉल्सही आपल्या दिमतीला असणार आहेत. शिवाय कायस्थ संस्कृती प्रदर्शन , महिला आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, सेलिब्रिटी शेफ्सबरोबर गप्पा, मनोरंजनाचे कार्यक्रम, निरनिराळ्या विषयांवरील चर्चासत्र असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे.

तसेच आपणा सर्वांच्या खास सोयीसाठी क्रेडिट / डेबिट कार्ड तसेच Paytm सारख्या माध्यमांतून व्यवहार इ. सुविधांचे आयोजन करण्यात येत आहे.

कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे तसेच कार्यक्रमाची जागा बदलायची शक्यता असल्यामुळे काही दिवस स्टाल्सचं बुकिंग स्थगित केलं होतं. दिवस बदलूनहीआधी बुकिंग केलेल्यांपैकी बहुतांश स्टॉलधारकांनी आपली उपस्थिती निश्चित केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार! आता उर्वरित स्टॉल्सचे (फूड व बिजनेस) बुकिंग आजपासून पुन्हा ओपन करण्यात येत आहे. स्टॉल्सचा आराखडा सोबत जोडला आहे.तरी इच्छुकांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती! खूप थोडे स्टॉल्स उरले असल्यामुळे खाद्ययज्ञात स्टॉल्स मिळवायची ही अखेरची सांधी आहे ह्याची नोंद घ्यावी.

"कायस्थ खाद्य-यज्ञ"

शारदा निलायम (वामनराव मुरांजन) शाळेचे पटांगण, नीलम नगर फेज २ जवळ, गवाणपाडा, मुलुंड (पूर्व).

(भरपूर पार्किंग उपलब्ध)

दि. १७-१८ डिसेंबर २०१६

१७ डिसेंबर - सायंकाळी ५ ते रात्रौ १०.३० पर्यंत
१८ डिसेंबर - सकाळी ११ ते रात्रौ १०.३० पर्यंत

*फूड स्टॉल*
साईज ८' x १२'
भाडे : रु.७,५००/-

*बिजनेस स्टॉल*
साईज ६' x ६'
भाडे : रु.६,०००/-

(सर्व पेमेंट चेकद्वारा)

बुकिंग / चौकशीकरता संपर्क :-

शिरिष बेंद्रे ९६१९९१७३९७
बिपिन कुळकर्णी ९८२००७४२०५
पंकज गडकरी ९८६७३९९२६२
समीर दळवी ९९२००२६०७४

- चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजोन्नती मंडळ, मुलुंड.