मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
 
 
घडलेल्या प्रमुख घटना

 

३ ऑगस्ट २०१५

कै.दत्ताजी ताम्हणे यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्ताने एक मेडिकल क्यांप घेण्याचा आमचा मानस होता पण काही कारणास्तव तो उपक्रम आम्हाला राबविता आला नाही.म्हणून त्या निमित्ताने १९ जुलै २०१५ रोजीकालिदास क्याफे मुलुंड (प) येथे सकाळी ९.३० वाजता “ पावसाळी रोगांवर उपचार व मार्गदर्शन आणि स्त्री समस्या  “ ह्या विषयी एक कार्यक्रम आयोजित केला. मुलुंड मधील प्रतिष्टीत आणि नामांकित डॉं.नितीन कर्णिक व डॉं.समीर प्रधान यांना त्यासाठी पाचारण केले.डॉं. नितीन कर्णिक यांनी “ पावसाळी रोग व उपचार ” या संधर्भात उद्भवणारे रोग उदा. मलेरिया,डेंग्यू,कॉंलरा,हिवताप,काविळ,लेप्टोस्पायरोसिस,टायफॉईड,स्वाईनफ्लू अशा विविध रोगांचे मुळ कारण सांगून त्यावर काय उपाययोजना करता येतील शिवाय त्यासाठी कोणत्या औषधांची आवश्यकता आहे हे सर्विस्तररित्या लोकांपुढे मांडले.पुढील सूत्रात डॉं.समीर प्रधान यांनी “ स्त्री समस्या ”  मुख्य करून स्त्रियांना होणारे आजार,मासिकपाळी,प्रसुतीकरण व त्याआधीची स्थित्यंतरे ह्या सर्वांची संपूर्ण माहिती सांगितली.विशेष म्हणजे दोन्ही डोक्टरानी वरील माहिती सांगताना समोर लावलेल्या स्क्रीनवर ते प्रात्यक्षिकरित्या दाखवल्यामुळे सर्वाना समजायला सुलभ झाले.त्याचबरोबर लोकांकडून आलेल्या प्रश्नांचे आणि शंकांचे   निरसन झाल्यामुळे सर्व ज्ञातीवर्गानी ह्या कार्यक्रमाची मजा लुटली.मुळात हा विषय जिव्हाळ्याचा असल्यामुळे सर्व उपस्थितांना ह्या सोहळ्याचा आनंद लुटता आला.शेवटी निशुल्क ठेवलेल्या खिमापावव पावभाजी ह्याचा आस्वाद घेऊन सोहळ्याची सांगता झाली.

आपली स्नेहांकित
( श्रीमती अर्चना गडकरी )
कार्यवाह