मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
कार्यक्रम
नजिकच्या काळातले
कोजागिरी पोर्णिमा
कुंकुमार्चन
गडकरी पुण्यतिथी
विद्यार्थी सत्कार
स्नेहसंमेलन
सामुदाईक सहल
सामुदाइक व्रतबंध सोहोळा
 
 
सामुदाईक सहल
आजपर्यंत वर नमूद केलेल्या अनेक स्थळी सहली आयोजित केलेल्या आहेत. पण आजमितीस ट्रान्सपोर्ट व इतर गोष्टींचे भाव लक्षात घेता आसपास जाण्यासही खूप खर्च करावा लागतो. म्हणून अशा प्रकारच्या सहलींवर बंधन आले. मनात इच्छा असूनही आम्हांला हा उपक्रम रेटता आला नाही. पण त्याची मजा आम्ही वेगळ्याप्रकारे चाखू लागलो. दर दोन वर्षानी रायगड जिह्यात होणाऱया सी.के.पी. अधिवेशनासाठी अनेक कायस्थ उत्सुक असतात असे आमच्या ध्यानात आले. त्यांच्या ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली तर समुहाच्या रुपाने आपल्याला तेथेही जाता येईल आणि एक प्रकारे सहलीचा आनंदही लुटता येईल ही भावना लक्षात घेऊन आम्ही सर्वांशी संवाद साधला व त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच दिनांक साली झालेल्या रोहे येथे व दिनांक साली झालेल्या अलीबाग येथे आम्ही अधिवेशन व सहल ह्या दोन्हींचा आनंद लुटला. ह्यावर्षी 20 जानेवारी 2013 रोजी महाड येथे सी.के.पी. अधिवेशन भरले जाणार आहे. त्यालाही अनेकांची मान्यता व प्रतिसाद मिळतो आहे. त्या निमित्ताने शिवरायांच्या रायगड स्थळी आम्ही आमचा माथा ठेवून ह्याची आम्हांला खात्री आहे. संबंधीतांनी आमच्याशी संपर्क करावा ही विनंती.
 
   

1) 7 जानेवारी 1990 ठाणा - ओवळा
2) 5 जानेवारी 1995 म्हात्रे वाडी - अलिबाग
3) 19 फेब्रुवारी 1999 वर्सोली सागर किनारा – अलिबाग
4) 22 ऑगस्ट 1999 डॉ. नितीन चौबळ यांचा फार्म हाऊस, येऊर – ठाणे आजी माजी विश्वस्त कार्यकारिणी निमंत्रित
5) 3 जून 2001 प्रधान बंगला – वांगणी
6) 3 फेब्रुवारी 2002 केळवे माहिम
7) 1 फेब्रुवारी तारा युसुफ मेहर अली सेंटर अभयारण्य कर्नाळा
8) 30 जानेवारी 2005 वर्सोली – अलिबाग 9) 20 जानेवारी 2007 केशवसृष्टी – उत्तन भाईंदर

वर्षा सहल
1) 9 सप्टेंबर 1984 सर्व युवक (फक्त) लोणावळा
2) 5 व 6 जुलै 1986 युवक (फक्त)खंडाळा, लोणावळा
3) 28 ऑगस्ट 1989 पळसदरी, कर्जत
4) 27 जुलै 2007 डॉ. उल्हास प्रधान बंगला, येऊर, ठाणे मंडळाने