आई एकवीरा |
|
 |
कार्ला गड, पुणे मुंबई प्रवासातील मळवली स्टेशन जवळ. अनेक समाजाची ही देवता. कायस्थ समाजाची कुलस्वामिनी.
आई तुझी लोणावल्याची वाट।
आई तुझे मलवली ठेसन।
आई तुझा गुल्लालू डोंगर। |
कालीकाई |
 |
कडापे, माणगांव जवळ निजामपूर मार्गे. कुळकर्णी, रणदिवे, कारखानीस, पालकर, देशमुख, गरुडे ह्या आडनावाची ही कुलस्वामिनी.
ही अगाध महिमा लीला । नवस दाविला । माऊली तुला।
जय जय देवी जय बोला।। |
विंझाई |
|
 |
ताम्हिणी गांव, मुळशी तालुका, पुणे जिल्हा. मंदीराभोवतालचा परिसर ताम्हणाच्या आकाराचा असल्याने या गावास ताम्हिणी हे नाव पडले. प्रधान, देशमुख, विळेकर, देशपांडे, सबनीस, ताम्हणे आदी कुटुंबियांची ही कुलस्वामिनी. |
जननी |
|
 |
मुंबई महाड मार्गावर कोलाड वरसगांवावरुन 4 मैलावर तिसे गावात जननीचा डोंगर. दिघे, देशपांडे यांची देवता. |
महालक्ष्मी |
|
 |
डहाणू येथील देवी. गडकरी, वाकसकर, घोसाळकर यांची देवी.
करवीराची महालक्ष्मी तू डहाणू प्रगट झाली। |
|
वाघजाई |
|
|
लोणावळ्याजवळील खंडाळा घाटात राजमाची पॉईंटजवळ, डोंगरे, कर्णिक, खोपकर, कोर्डे या कायस्थ बांधवांची देवी.
खंडाळा घाटात राजमाचीवर आहे तुझा ग वास। |
बापुजीबुवा |
|
 |
सावरसई - पेण तालुका, दोंदे, वढावकर, मोकाशी, गुप्ते यांचे कुलस्वामी. कडापे गावात कालीकाईजवळसुध्दा ह्यांचे स्थान आहे.
हे गाव कडापा असे तुझे बस्तान। हे रान काटेरी करवंदीचे ठाण। त्या डोंगरामधूनी मिळे तुला बहुमान।। |
खंडोबा |
|
 |
जेजुरी गाव, पुणे फलटण मार्गावर मुळ शंकराचा अवतार.
जेजुरीच्या खंडेराया जागराला या! या! |
बहिरी |
|
पुणे सासवड दरम्यान मल्हारगड आहे तेथून 4 कि.मी. सोनेरी गावात खंडोबाचे रुप. बहिरवनाथ किंवा बहिरीबुवा या नावानेही संबोधतात.
मल्हारगडच्या बहिरीबुवा जागराला या! या! |
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे |
|
|
 |
करवीरात कर ठेवूनी वसली ग लक्ष्मी।
तीनपीठात वसली माझी माय महालक्ष्मी। |
|
|
तुळजापूर महालक्ष्मी |
 |
हे आई गं अंबाबाई तू माझे तुळजापूरचे आई।
तुळजापुरचे आई ऐक आज नवी नवलाई। |
|
|
रेणूकादेवी |
 |
आई रेणूका वसली आहे कडे पठारावरी।
शक्तीपीठाचे स्थान जणू ते आहे त्या माहुरी। |
|
|
सप्तश्रृंगी |
|
 |
अर्ध्यापीठाची सप्तश्रृंगी तू सात डोंगरामधी।
चढे पायरी भक्तगणांची आस मनामंदी। |
|
|