मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
कार्यक्रम
नजिकच्या काळातले
कोजागिरी पोर्णिमा
कुंकुमार्चन
गडकरी पुण्यतिथी
विद्यार्थी सत्कार
स्नेहसंमेलन
सामुदाईक सहल
सामुदाइक व्रतबंध सोहोळा
 
 
 
विद्यार्थी सत्कार
गेली अनेक वर्षे आपले मंडळ उज्वल यश संपादन करणाऱया गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना यथायोग्य पारितोषिके देत आली आहे. शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत ठरावीक विषयात जास्तीत जास्त मार्क मिळविणाऱयांना सभासदांनी दिलेल्या त्या विषयाच्या देणगीप्रित्यर्थ व्याजरुपाने मिळणारी रक्कम देण्यात येत होती. पण कालांतराने त्या देणगीचे व्याज खूपच अल्प प्रमाणात मिळत असल्यामुळे आणि सभासदांच्या नांवे देण्यात येणाऱयांची यादीही मोठ्या प्रमाणात वाढत गेल्यामुळे एक ठराविक रक्कम प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात यावी असे मंडळाने ठरविले. दरम्यान शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षांबरोबर C.B.S.C. व I.C.S.C. ह्या शिक्षण संस्थांची मुलेसुध्दा वाढू लागली. त्यांच्या वर्गवारीचा कस कसा ठरवायचा याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. संस्कृत विषयात प्राधान्य मिळविणाऱया विद्यार्थ्यास व एक शिष्यवृत्ती पारितोषिक देण्यासाठी आपल्याच देणगीदारांनी श्रीमती पी. के. चौबळ यांनी भरघोस देणगीही मंडळाला दिली होती. पण असे विद्यार्थी न मिळाल्यामुळे आम्ही ते देऊ शकलो नाही. तरी कै.
 
   
चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांच्या नावे एक पारितोषिक ठेवले असून मुलुंडमधील कोणत्याही ज्ञातीतील S.S.C. च्या परीक्षेत मुलुंड विभागात सर्वप्रथम येणाऱया विद्यार्थ्यास हे पारितोषिक देण्याची सोय मंडळ अनेक वर्षे करीत आली आहे. अनेक समस्यांचा विचार करता एक ठास रक्कम प्रत्येक विद्यार्थ्यांस द्यावी असे ठरले. सातवी, दहावी, बारावी, C.B.S.C., I.C.S.C. पदवीधर, उच्च पदवीधर, Ph.d., डॉक्टर्स, इंजिनियर्स, टेक्नीकल आणि विशेष म्हणजे कलानिपूणात घवघवीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा मागोवा घेता उपस्थितींची संख्या खूपच कमी भासल्याने एक भरगच्च रक्कम प्रत्येकास द्यावी ही विचारधारा एकमताने मंजूर झाली. पूर्वी हा उपक्रम राबविताना सर्वसाधारण मुलांना मार्कलीस्ट उपलब्ध झाल्यावर त्याप्रमाणे स्थळ व दिवस आखला जायचा.