चां. का. प्रभु समाजोन्नती मंडळ, मुंबई यांनी 6 मे 1999 साली ज्ञातीबांधवांच्या मुलांसाठी सामुदायिक व्रतबंधाचा एक नवीन उपक्रम हाती घेतला. ह्या समारंभाला एकूण 19 बटुंनी सहभाग घेऊन हा समारंभ यशस्वी करण्यात हातभार लावला. मंडळातर्फे बटुंच्या कुटुंबांपैकी बटु व त्याचे 5 नातेवाईक यांची सवलतीच्या दरात भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर आलेल्या इतर मंडळींनासुध्दा रितसर खर्चात भोजनाची व्यवस्था केली होती. आपल्या समाजाच्या कळवास्थित सौ. देशपांडे यांनी ह्या व्रतबंधाचे समयोचित पौरोहित्य स्विकारुन समारंभाची शोभा वाढवली. सर्व उपस्थित ज्ञातीबांधवांनी या उपक्रमाचे कौतूक करुन असे समारंभ वेळोवेळी घडवून आणावेत असे प्रतिपादन केले. कालिदास कॅफे येथे पार पडलेल्या ह्या समारंभातील भोजनाची व्यवस्था नेहमीप्रमाणे श्री. हेमंत रणदिवे यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. |