मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
उपक्रम
गडकरी कट्टा
श्री.विंझाई वधुवर सुचक केंद्र
वॆद्यकीय शिबीर व परिसंवाद
 
 
 
गडकरी कट्टा

कै. राम गणेश गडकरी कट्यावर बहरलेली फुले

पहिले पुष्प :- सौ. नयना वैद्य प्रेमयोग ह्या विषयावर त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने प्रेमाची परिभाषा व विविधात्मक प्रेम व्यक्त करुन लोकांची मने जिंकली.

दुसरे पुष्प :- 12 एप्रिल 2009 श्री. शं. रा. पेंडसे मी मुशाफीर साहित्याचा सांगताना कथा कशा सुचतात व आपल्या दैनंदिन जीवनात कथाबीज कसे असते ह्याची ओळख दाखवली.

तिसरे पुष्प :- 26 एप्रिल 2009 डॉ. सौ. अर्चना गिरीश सबनीस बाळ तू कोमातच रहा ह्या स्वतच्या वडिलांनी लिहिलेल्या कादंबरीचे कथन करुन काळजाचा ठोका चुकविला.

चौथे पुष्प :- 10 मे 2009 डॉ. नितीन द. कर्णिक यांनी वृध्दांचे आजार व उपाय हा विषय हाताळताना समस्त कट्टेधारकांची मने जिंकून त्यांच्याशी संवाद साधला.

पाचवे पुष्प :- 24 मे 2009 श्री. विजय वैद्य अग्निशमन दलातील चित्तथरारक अनुभव आगीचे महत्व सांगताना गॅस हा आपला जेवढा मित्र असतो तेवढाच तो नीट हाताळला नाही तर शत्रुही होऊ शकतो. हे सांगता सांगता ते मागील पांढऱया भिंतीवर स्लाईड दाखवून सुरक्षिततेचे उपाय सांगत होते.

सहावे पुष्प :- 14 जून 2009 रोजी सौ. मीना कां. वानखेडे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनशक्ती मानवाची जडण-घडण ही गर्भातच होते असे सांगून त्यांनी संवेदना, संस्कार जोपासले पाहिजे हे सांगताना अनेक दाखले देऊन प्रेक्षकांच्या मनावर रुजवले. श्री. दत्ताजी ताम्हणे यांनी सुचविले की आपण कट्यासाठी सर्वांना एकच विषय देऊया - ``माझ्या सार्वजनिक जीवनातील कथा, व्यथा आणि अपेक्षा’. पुढे जमल्यास आपण या सर्व वक्त्यांच्या अनुभवांचे पुस्तक तयार करुया. म्हणून सातव्या पुष्पापासून सर्व वक्त्यांना ``माझ्या सार्वजनिक जीवनातील कथा, व्यथा आणि अपेक्षा’ हा विषय देण्यात आला.

सातवे पुष्प :- 28 जून 2009 सौ. इंदिरा दि. कुळकर्णी यांनी माझ्या सार्वजनिक जीवनातील कथा, व्यथा आणि अपेक्षा यावर बोलताना आपल्या शालेय जीवनाच्या प्रगतीपथावर त्यांना कसे अनुभव आले आणि यशाच्या शिखरावर चढल्यानंतर किती संकटांना सामोरे जावे लागते हे अत्यंत प्रभावीपणे लोकांपुढे मांडले.

आठवे पुष्प :- 12 जुलै 2009 डॉ. सूर्यकांत ग. येरागी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला. समाजाने याला चोख उत्तर दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

नववे पुष्प :- 26 जुलै 2009 श्री. बी. एन. तांबोळी समस्त मुलुंडकरांना ज्यांनी योगाचे धडे देऊन त्यांची कार्यशक्ती वाढवली त्या योगकर्मी तांबोळींनी आपले अनुभव नेटकेपणाने मांडले.